spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आशियाई पाणपक्षी गणना २०२६ उपक्रमाचा यशस्वी समारोप

– आशियाई पाणपक्षी गणना, पाणस्थळ पक्षी, पाणथळ जागांची नोंद 

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर वन विभाग तसेच स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या “आशियाई पाणपक्षी गणना २०२६” या महत्त्वपूर्ण उपक्रमाचा समारोप कार्यक्रम मोगरकसा संवर्धन क्षेत्र येथे यशस्वीरीत्या संपन्न झाला. “आशियाई पाणपक्षी गणना हा पाणस्थळ पक्षी आणि पाणथळ जागांची नोंद तसेच देखरेख करण्यासाठीचा एक नागरिक-विज्ञान आधारित उपक्रम आहे. या कार्यक्रमांतर्गत, स्वयंसेवक राज्य समन्वयकांच्या मार्गदर्शनाखाली हिवाळ्याच्या मध्यातील जलचर पक्ष्यांची गणना करतात. हो साहिती एकत्रित करन स्थानिक राज्य, राष्ट्रीय आणि स्थलांतर मार्ग पक्ष्यांच्या स्थलांतराचा नित्याचा मार्ग स्तरावर पक्ष्याच्या संख्येनात कल लोकसंख्येचा जाणून लोकसंख्येचा कल) वापरली जाते. भारतात, ए डब्लु सी चे आयोजन ‘वेटलोड इंटरनॅशनल-दक्षिण आशिया आणि राज्य वन विभाग कर्मचारी, स्थानिक पक्षी निरीक्षक, स्वयंसेवी संस्था (एनजीओ), संशोधक आणि विद्यार्थी यांच्या सहभागाने संयुक्तपणे करण्यात येते. तथापि, सदर पाणपक्षी गणना ही डिसेंबर २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या दरम्यान केली जाते. त्या अनुषंगाने मोगर॑कसा संवर्धन क्षेत्र येथे (दि.२२) फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, नागपूर वनविभाग, राणीदुर्गावती आश्रम शाळा टांगला येथील विद्यार्थी तसेच बर्ड्स ऑफ विदर्भ ग्रुप यांच्या सहभागाने पक्षी गणना तसेच जैवविविधता अभ्यास करुन साजरा करण्यात आला. सदर उपक्रमांतर्गत उपस्थित विद्यार्थ्यांचे चमु बनवुन संवर्धन क्षेत्रातील जैवविविधता अभ्यास करण्याच्या दृष्टीने तसेच निरीक्षण नोंदविण्याकरिता क्षेत्रीय भेट आयोजीत करुन विद्यार्थ्यांना पक्षी अभ्यासकांच्या मागदर्शनाअंतर्गत माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमात सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ, डॉ. भारत सिंह हाडा, यांनी जैवविविधता संवर्धनासाठी शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ, अशासकीय संस्था तसेच शासकीय स्तरावर समन्वय असणे आवश्यक असल्याचे आपल्या मनोगतासुन व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना पक्षी संवर्धनाचे महत्व जाणुने दिले. याप्रसंगी डॉ. विनिता व्यास, उपवनसंरक्षक, नागपूर वन विभाग यांनी विद्यार्थ्यांना जैवविविधतेचे महत्व पटवुन दिले. तसेच पुनम पाटे, संचालक, महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प, यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना सजग राहुन आपल्या भोवताली असलेल्या जैवविविधतेचे संवर्धन कसे करु शकतो याबाबत माहिती दिली. ‘विदर्भातील पक्षी ग्रुपचे अविनाश लोट यांनी आशियाई पाणपक्षी, मणना उक्रमाबाबत विद्यार्थ्यांच्या सहभागातुन नागपूर मधील तलावांमध्ये केलेल्या पाणपक्षी प्रजातीच्या नोंदीबाबत सविस्तर अहवाल सादर केला. सदर कार्यक्रमात रुपाली सावंत विभागीय वन अधिकारी (जैवविवधिता) स्वेता रंगनाथ आडे, सहाय्यक वनसंरक्षक (जैवविविधता), सहाय्यक वनसंरक्षक नागपुर वनविभाग, लुचे वनपरिक्षेत्र अधिकारी, सागर बन्सोड, मोगरकसा व परिक्षेत्रातील वनकर्मचारी इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान पाणपक्षी गणना उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या सहभागींचा प्रमाणपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला, सदर उपक्रमामुळे पाणथळ क्षेत्रांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित होऊन पाणपक्षी संवर्धनास चालना मिळण्यास तसेच स्थानिक स्तरावर जनजागृती वाढण्यास मदत होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.