नागपूर :- नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासनातर्फे ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर दाखल झालेल्या अनुयायासाठी दीक्षाभूमी परिसरामध्ये स्वच्छतेसह इतर नागरी सुविधा पुरविण्यात आली आहे. याबाबत देशभरातून आलेल्या अनुयायांनी नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाचे आभार मानले तसेच याबद्दल लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच अनुयायाकरिता सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेचे काम अत्यंत महत्वपूर्ण असल्याचेही सांगितले.
शुक्रवारी २ ऑक्टोबर रोजी नागपूर शहरात दीक्षाभूमीवर ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा होणार असल्याने मंगळवार ३० सप्टेंबरपासून अनुयायांचे नागपूर नगरात आगमन सुरू झाले आहे. अनुयायांच्या राहण्याची, विश्रांतीसाठी निवारा, स्वच्छता गृह, प्रसाधन गृह, पाऊसाची शक्यता असल्यास विविध शाळा अशा आवश्यक नागरी सुविधा मनपा आणि जिल्हा प्रशासनातर्फे पुरविण्यात आल्या आहेत.

दीक्षाभूमी परिसरात व इतरत्र अनुयायांना त्रास होणार नाही, तसेच त्यांना नागरी सुविधा मिळाव्या यासाठी नागपूर जिल्हा प्रशासन व नागपूर महानगरपालिकेने संपूर्ण नागरी सुविधा पुरविण्यासाठी पूरेपुर प्रयत्न केले आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे दीक्षाभूमी, माता कचेरी, शासकीय आयटीआय, कारागृह परिसरात नागरीक सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे. याठिकाणी आलेल्या अनुयायांनी मनपाच्या नागरी सुविधा बाबतच्या कामाचे कौतुक केले. नागपूर नगरीत बौद्ध अनुयायांसाठी चांगली सुविधा, स्वच्छतागृह व ठिकठिकाणी स्वच्छता करण्यात येत असल्याची चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली.
नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद
बिहार मधील गया जिल्हा येथून आलेले राम धनेष म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षा दिलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमीवर महानगरपालिकेतर्फे नागरिकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची पुरेपुर दक्षता घेण्यात आली आहे. परसिरात स्वच्छतागृह आणि प्रसाधनगृहाचा उत्तम अशी सोय उपलब्ध करून दिली आहे. शिवाय राहण्याकरिता निवारा सुद्धा उपलब्ध करून दिले असल्याने त्यांनी मनपा आणि जिल्हा प्रशासनाच्या कामावर समाधान व्यक्त केले.
बंगलोर येथील यशवंत म्हणाले की, मी नेहमी बंगलोर वरुन नागपूरला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित् येत असतो. मैसूर शहराप्रमाणेच नागपूर शहर स्वच्छतेत खूपच चांगले आहे. दीक्षाभूमीमध्ये आलेल्या अनुयायांकरिता मनपातर्फे चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने महानगरपालिका कौतुकास पात्र आहे.
यूपीच्या लखनऊ येथून आलेल्या आलेले मनीष गौतम यांनी सांगितले की, महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनातर्फे अनुयायाकरिता राहण्याकरिता निवारा स्वच्छतागृह, स्वच्छता गृह प्रसाधन व पाण्याची व्यवस्था चांगली अशा नागरी सेवा उपलब्ध करून दिले यामुळे आमची चांगली सोय झाली आहे.
नागपुरातील शुभम काळबांडे म्हणाले की, धम्मचक्र प्रवर्तन दिनादिनानिमित्त नागपूर शहरात दीक्षाभूमी येथे आलेल्या नागरिकांना मनपातर्फे चांगल्या दर्जेदार नागरीक सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे. मनपाच्या स्वच्छता कर्मचारी दिवसरात्र सफाईचे काम करीत आहेत यामुळे रस्त्यावर कुठल्याही प्रकारचा कचरा दिसून येत असल्याने त्यांनी मनपाचे आभार मानले.








