Home Latest News ५० रुपयांच्या वादातून मित्रावर काचेच्या ग्लासने हल्ला; एक गंभीर जखमी

५० रुपयांच्या वादातून मित्रावर काचेच्या ग्लासने हल्ला; एक गंभीर जखमी

0
58

 

नागपूर १४ : नागपूरच्या न्यू कामठी परिसरात किरकोळ पैशांच्या वादातून मैत्रीचे संबंध रक्तरंजित झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, फक्त ५० रुपयांच्या थकबाकीवरून मद्यधुंद तरुणाने आपल्या मित्रावर काचेच्या ग्लासने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. पोलिसांच्या माहितीनुसार शाहिद खान (३०) आणि शेख सलमान (२८) हे दोघे मित्र १० ऑगस्ट रोजी न्यू कामठी येथील बस स्टँड रोडवरील देशी दारू भट्टीत गेले होते, तेव्हा शाहिदने सलमानकडे मागील काही दिवसांपासून थकित असलेले ५० रुपये परत मागितले, मात्र या साध्या मागणीवरून सलमान संतप्त होऊन वाद घालू लागला आणि वाद चिघळताच रागाच्या भरात त्याने हातातील काचेचा दारूचा ग्लास शाहिदच्या डोक्यात फोडला, ज्यामुळे शाहिद गंभीर जखमी झाला आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच न्यू कामठी पोलीस घटनास्थळी दाखल होऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला असून, किरकोळ कारणांवरून होणाऱ्या हिंसक घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

@filephoto