किशोर साहू: मौदा, ता. १३: भारतीय जनता पार्टी नागपूर जिल्हा (ग्रामीण) रामटेक विधानसभा अंतर्गत सोमवार ( दि. 09 सप्टेंबर)रोजी मौदा मंडळात लोकनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कार्यशाळा व मंडळनिहाय संघटनात्मक आढावा बैठक मौदा येथे संपन्न झाली. या बैठकीला माजी आमदार टेकचंद सावरकर, जिल्हा महामंत्री अनिल निधान, रिंकेश चवरे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष चेतन खड़से , माजी जि प सदस्या राधा मुकेश अग्रवाल, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
बैठकीत मौदा मंडळाचे अध्यक्ष मुकेश अग्रवाल, माजी अध्यक्ष अनुसूचित जाती आघाडी नागपूर जिल्हा नरेश मोटधरे,
माजी भाजपा तालुकाध्यक्ष चांगो तिजारे,माज़ी नगराध्यक्ष भारती सोमनाथे, माजी नगर उपाध्यक्ष मुन्ना चालसानी, मौदा तालुका संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष रामेश्वर लिचडे,,रमेश कुंभलकर, डॉ. नीलिमा घाटोळे, भारती सोमनाथे, राजु सोमनाथे, अशोक हटवार, नरेश बावनकूळे, भगवान बावनकुळे, रोशन उमप, राहुल पोटभरे सह तालुक्यातील भाजपा , भाजयुमो पदाधिकारी व कार्यकर्त्यांची विशेष उपस्थिती होती.
बैठकीत विविध संघटनात्मक विषयांवर सविस्तर चर्चा झाली आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.




