spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

इंधन समस्या? आता थेट संपर्क साधा ‘या’ अधिकाऱ्यांशी; भंडारा जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

हंसराज,प्रतिनिधी भंडारा :- सद्यस्थितीत जागतिक परिस्थिती विचारात घेता भंडारा जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत कोणतीही अडचण निर्माण झाल्यास नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. संबंधित समस्यांबाबत नागरिकांनी खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे.

तालुकानिहाय संपर्क अधिकारी व भ्रमणध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे :

भंडारा : पोचीराम कापडे, निरीक्षण अधिकारी – 8830009258

मोहाडी : पल्लवी मोहाडीकर, निरीक्षण अधिकारी – 7798319148

तुमसर : प्रवीण आबूलकर, निरीक्षण अधिकारी – 9503071978

लाखनी : रोशन कापसे, निरीक्षण अधिकारी – 9403955542

साकोली : रविंद्र उन्हाळे, निरीक्षण अधिकारी – 9923045230

लाखांदूर : धीरज मंत्राम, निरीक्षण अधिकारी – 9822873774

पवनी : अर्चना मेश्राम, निरीक्षण अधिकारी – 8766950789

पेट्रोल, डिझेल किंवा गॅस सिलेंडर संदर्भात काही अडचण अथवा टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी संबंधित तालुक्याच्या संपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी, भंडारा यांनी केले आहे.

Popular Articles