spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एलिट पब्लिक स्कूल चाचेर येथे गरबा महोत्सव उत्साहात साजरा

किशोर साहू,मौदा :- नेहमीच शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या चाचेर येथील एलिट पब्लिक स्कूलमध्ये गरबा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक परंपरांची जाणीव निर्माण करणे, कलागुणांना वाव देणे आणि सर्वांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

रक्षा बहुउद्देशीय शिक्षण संस्था, खंडाळा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या महोत्सवात विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर आकर्षक गरबा व दांडिया नृत्य सादर केले. रंगीबेरंगी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या नृत्यकलेतून उपस्थितांची मने जिंकली. संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व शाळा व्यवस्थापनाने विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे महोत्सवाला विशेष रंगत आली.

या कार्यक्रमाला शाळेचे संचालक राष्ट्रपाल सी. गजभिये यांच्यासह शाळा व्यवस्थापनातील पदाधिकारी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, कलागुणांना प्रोत्साहन मिळते आणि भारतीय संस्कृती व परंपरांची ओळख अधिक दृढ होते, असा संदेश या महोत्सवातून देण्यात आला.

Popular Articles