नागपूर :- खैरे कुणबी समाज, पश्चिम नागपुर तर्फे सदाचार सभागृह वाडी नागपूर येथे 26 नोव्हेंबर रोजी खैरे कुणबी समाजातील बांधव , भगिनींचा मेळावा व जेष्ठ नागरिक सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी समाजातील बहुसंख्य बंधु -भगिनींनी उपस्थिति दर्शवली.


यावेळी अध्यक्षस्थानी ज्ञानेश्वर शेंडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या कार्यक्रमात संघटक महादेवराव वैद्य, सुरेश खेवले, नेमदास मस्के यांनी मार्गदर्शन केले. समाज बांधवांना एकजुटतेचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी राजेश पिंपळे, राजेंद्र महाजन, राजीव धानोरकर, वैभव रिठे, प्रशांत मस्के, मोहीत शेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक मोहन डंभारे यांनी केले तर आभार गिरीश कावळे यांनी मानले.




