spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गोबरवाही पोलिसांची अवैध रेती वाहतुकीवर मोठी कारवाई; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

हंसराज, प्रतिनिधी भंडारा गोबरवाही (तुमसर) दि. १० :- तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत रेल्वे फाटक परिसरात अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर पोलिसांनी धाड टाकून १२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोलिंग दरम्यान रेल्वे फाटक परिसरात विनापरवाना रेती वाहतूक करताना ट्रॅक्टर क्रमांक MH-36 Z-3649 आणि एक विना क्रमांकाचा ट्रॅक्टर आढळला. पोलिसांनी विचारपूस केली असता चालकांकडे परवाना नसल्याचे समोर आले. या कारवाईत ५ लाख ६ हजार रुपयांचा एक ट्रॅक्टर-ट्रॉली (सह १ ब्रास रेती) आणि ६ लाख ६ हजार रुपयांचा दुसरा ट्रॅक्टर-ट्रॉली, असा एकूण १२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी आरोपी रवींद्र शालिकराम उईके (२७, रा. पिपरा) आणि पवन राजहंस पंधरे (२०, रा. आंबागड) यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२), महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८ (८) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ७ व ९ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार पेंदाम आणि पोलीस शिपाई मडावी यांनी केली आहे. या कारवाईमुळे अवैध रेती माफियांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास गोबरवाही पोलीस करीत आहेत.

Popular Articles