spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गोंडवाना विद्यापीठाने व्यवसायाभिमुख शिक्षणावर भर द्यावा – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश

 

मुंबई, दि. 25 :- विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक पदव्या न देता  रोजगाराभिमुख व व्यावसायिक प्रशिक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम व आदिवासी भागात शिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षण आणि रोजगारनिर्मिती यावर विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) संदर्भात उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीत विद्यापीठाच्या विविध योजनांचे सादरीकरण करण्यात आले. बैठकीत विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणूगोपालरेड्डीउपसचिव प्रताप लुबाळ,डॉ. प्रशांत बोकारे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

गोंडवाना विद्यापीठाच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी सादर करण्यात आलेल्या डीपीआरमध्ये प्रादेशिक गरजांनुसार अभ्यासक्रमांची आखणीनवीन इमारतींचा आराखडासंशोधन केंद्रेडिजिटल शिक्षण सुविधा यांचा समावेश करावा आणि स्थानिक संसाधनांवर आधारित उद्योगांना मदत करणारे संशोधन करावे. आदिवासी व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या जीवनमानात परिवर्तन घडवण्यासाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.पाटील यांनी यावेळी सांगितले.

उच्च शिक्षणातील गळतीचे प्रमाण रोखणेगडचिरोली जिल्ह्यातील तसेच विद्यापीठ परीक्षेत्रातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नयेतो शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावा, यासाठी प्रयत्न, संधीच्या अभावामुळे पदवी प्राप्त करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ आपल्या गावात’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला जात आहे. विद्यार्थी उच्च शिक्षण संस्थेपर्यंत पोहोचू शकत नसल्यास शिक्षण संस्थांनी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्यामध्ये शैक्षणिक जाणीव निर्माण करणेशिक्षणाचा प्रचार-प्रसार करणे, या उपक्रमांतर्गत गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील अर्धवट शिक्षण सोडलेलेशाळाबाह्य व इतर अडचणीमुळे शिक्षण पूर्ण न करू शकलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे व त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून रोजगाराभिमुख कौशल्यावर आधारीत शिक्षण देणे हा गोंडवाना विद्यापीठाचा मानस असल्याची माहिती देण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.