– ग्रामपंचायत पंचायत ची जबाबदारी वाढली
साळवा :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी राज्यभरातील त्यांच्या पुतळ्यांच्या परिसरात स्वच्छता, रंगरंगोटी, फुलांची सजावट व हारांची व्यवस्था करण्याबाबत राज्य शासनाने संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.
नगर विकास विभागाचे सहसचिव यांना पाठवलेल्या पत्रात, कामगार नेते रमेश मारुती जाधव यांनी १० नोव्हेंबर २०२५ रोजी केलेल्या निवेदनाचा उल्लेख करण्यात आला आहे. या निवेदनात डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या परिसरात महापरिनिर्वाण दिनापूर्वी स्वच्छ व सुसज्ज वातावरण निर्माण करण्याची मागणी करण्यात आली होती.
शासनाने स्पष्ट केले आहे की, राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपंचायत,पंचायत समिती, ग्रामपंचायत या संस्था डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व संबंधित स्थळांवर स्वच्छता मोहिम, रंगरंगोटी, फुलांची सजावट व हारांची व्यवस्था सुनिश्चित करतील.
कक्ष अधिकारी अक्षय भोसले यांनी जारी केलेल्या पत्रात संबंधित विभागांनी तत्काळ योग्य कार्यवाही करावी, असे नमूद केले आहे.पत्राची प्रत समाज कल्याण आयुक्त, पुणे व कार्यासन बांधकाम विभाग यांना देखील पाठवण्यात आली आहे.




