spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

जी.प. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक

– आ. रवी राणा यांचे लक्षवेधी वर ना. गोरे यांचे उत्तर

अधिवेशनादरम्यान महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटना (नोंदणी क्र. २५७/८९) यांच्या महिला राज्य संघटक आणि संरक्षक महिला अध्यक्ष पुष्पा वानखडे, शालिनी लकडे, चंदा बेलसरे, दिपाली शिंदे, पद्मा जाधव, सुनंदा नाथे, मोनिका भुते, कुंदा गादे, आणि मीरा भास्करे, निकिता गणवीर, सरिता धंदर, सुनंदा राऊत, सुनीता राऊत, शारदा बारड, पद्मा गिरी, स्वाती अळसपुरे आदींनी अध्यक्ष विधानसभा आश्वासन समिती आ. रवी राणा तसेच राज्याचे आरोग्य संचालक अंबाडकर यांना निवेदन देऊन आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधले.

संघटनेतर्फे 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी एनपीएस योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, एलएचव्ही व एएनएम पदांची वाढ व पुनर्स्थापना करणे, एएनएमचा कायम प्रवास भत्ता 1500 रुपयांवरून 3000 रुपये करणे, कालबद्ध लाभासाठी एलएचव्ही प्रशिक्षणाची अट रद्द करणे, कोविड काळातील कार्याबद्दल दोन वेतनवाढी देणे तसेच नोंदणी नूतनीकरणासाठी सीएनई अट रद्द करणे अशा मागण्या केल्या.

आमदार रवी राणा यांनी या मागण्यांची दखल घेत लक्षवेधी सूचना क्र.१७८४ द्वारे वरील विषय विधानभवनात मांडला. त्यावर ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांनी लेखी स्वरूपात सकारात्मक उत्तर राणा यांना पाठवले. उत्तरा मध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना जोखीम भत्ता, हार्डशीप, भत्ता देणे या संबंधाने आरोग्य व वित्त मंत्रालयाचेकडे शासनस्तरावर समन्वय करण्यात येत असल्याचे मंत्री गोरे यांनी पाठवलेल्या लेखी उत्तरात स्पष्ट केले. वरील संघटनेने शासनाचे मंत्री महोदयांचे, आ. राणा यांचे आभार मानले आहेत.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.