Home Latest News रामनगरीत ४ नोव्हेंबरला भव्य ४४ वी शोभायात्रा

रामनगरीत ४ नोव्हेंबरला भव्य ४४ वी शोभायात्रा

0
53

– मुख्य आकर्षण: महाभारतातील ‘युधिष्ठिर’ गजेंद्र चव्हाण  

सचिन चौरसिया, प्रतिनिधी रामटेक :- प्रभु श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रामनगरीमध्ये त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त वैकुंठ चतुर्दशीला भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात येत असते. यंदा येत्या ४ नोव्हेंबर ला भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे. अगस्ती आश्रमचे ब्रह्मलीन संत व भारतीय जनसेवा मंडळ चे संस्थापक अध्यक्ष गोपालदास बाबा यांच्या प्रेरणेने ४३ वर्षांपूर्वी ही शोभायात्रा सुरू झाली होती. त्यांनी तब्बल ३९ वर्षे ती उत्तम प्रकारे चालवली. यावर्षी या शोभायात्रेचे ४४ वे वर्ष साजरे होत आहे. या पार्श्वभूमीवर रामाळेश्वर मंदिरात शोभयात्रेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीला मंडळाचे अध्यक्ष चंद्रपाल चौकसे, सचिव माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, उपाध्यक्ष चंद्रकांत ठक्कर, सहसचिव सुभाष बघेले, यांच्यासह सदस्य धनराज काठोके, अशोक पटेल, शेखर बघेले, नत्थू घरजाळे, विनायक डांगरे आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. नियोजित बैठकीत त्रिलोक मेहर यांची शोभायात्रा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तसेच गोपी कोल्लेपरा कार्यकारी अध्यक्ष तर ऋषि किमतकर कोषाध्यक्षपदी जवाबदारी देण्यात आली आहे. तर अजय खेडगरकर, सचिव, मोनू रघुवंशी सहसचिव यांची निवड करण्यात आली. शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या. रीतेश शर्मा झाकी संचालन समिती, निर्भय घाटोळे निधी संकलन, संजय मुलमुले ध्वनिक्षेपण, हुकुमचंद बडवाईक पूजाअर्चना, नत्थू घरजाळे प्रचार प्रसार व पत्रकार संघ, सुभाष बघेले मंच संचालन, शेखर बघेले भोजन व्यवस्था, धनराज काठोके व राजाराम देशमुख सुशोभित द्वार निरीक्षण, अ‍ॅड. संजय खंडेलवाल,अनिल भोरसले व दयानंद रेवतकर झाकी निरीक्षण अश्या विविध जवाबदार्‍यासाठी समित्या गठित करण्यात आल्या आहेत. शोभायात्रा पारंपरिक उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडावी यासाठी सर्व समित्यांनी तयारीला सुरूवात केली आहे. धार्मिक आणि सांस्कृतिक रंगत असलेल्या या शोभायात्रेची आतुरतेने प्रतीक्षा सुरू आहे.शोभायात्रेला तनमनधन पुर्वक सहकार्य करावे असे आवाहन शोभायात्रा समीतीचे वतीने करण्यात आले आहे.