– भिक्खू-भिक्खुणी संघाला भोजनदान, चीवरदान व फलदान
– बहुजन हिताय, बहुजन सुखाय’च्या प्रेरणेतून सामाजिक व धम्म उपक्रम – भिक्खुणी साक्य धम्मदिन्ना अयाजी
कामठी :- विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रेरणास्त्रोत, स्मृतिशेष महादायिका मॅडम नोरिको ओगावा यांच्या सातव्या स्मृतिदिनानिमित्त कामठी येथील ड्रॅगन पॅलेस परिसरात अत्यंत भक्तीमय व मंगलमय वातावरणात ‘पुण्यानुमोदन’ तथा महापरित्राण पाठ व धम्मदान सोहळा उत्साहात पार पडला. ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या प्रमुख तथा माजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या पुढाकारातून या विशेष धार्मिक व सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बुधवार, २ सप्टेंबर रोजी सकाळी १०:०० वाजता सुरू झालेल्या या सोहळ्यात पूज्य भिक्खू संघ व भिक्खुणी साक्य धम्मदिन्ना अयाजी यांच्यासह भिक्खुणी संघाच्या प्रमुख उपस्थितीत बुद्ध वंदना, परिक्रमा सूत्रांचे सामूहिक संग्रहण, महापरित्राण पाठ आणि धम्मदेशना संपन्न झाली. यानंतर ॲड. सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते भिक्खू व भिक्खुणी संघाला अत्यंत श्रद्धेने चीवरदान, फलदान तसेच भोजनदान करण्यात आले. या सर्व कुशल कर्माचे पुण्य स्मृतिशेष महादायिका मॅडम नोरिको ओगावा यांच्या स्मृतीस तसेच समाजातील ज्येष्ठ व प्रियजनांना समर्पित करण्यात आले.
भगवान बुद्धांची नैतिक मूल्ये आचरणात आणणे काळाची गरज : पुज्य भिक्खुणी साक्य धम्मदिन्ना अयाजी
याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पुज्य भिक्खुणी साक्य धम्मदिन्ना अयाजी यांनी सांगितले की, “केवळ स्वतः धम्ममार्गावर चालणे पुरेसे नसून, समाजातील प्रत्येकाला धम्माच्या प्रवाहात सामील करणे, त्यांच्या जीवनात प्रज्ञा, शील आणि करुणेची रुजवण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. तथागत भगवान बुद्धांच्या ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ या मूलमंत्राला केंद्रस्थानी ठेवून सामाजिक परिवर्तनासाठी निरंतर कार्य झाले पाहिजे.”भगवान बुद्धांच्या काळातील दानशील उपासक-उपासिकांच्या परंपरेचा दाखला देत, समाजात धम्मप्रसार, प्रबोधन आणि दीन-दुबळ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या कार्याचा भिक्खू-भिक्खुणी संघाने विशेष गौरव केला. तसेच त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून असेच लोककल्याणकारी कार्य घडो, असा मंगल आशीर्वाद दिला.
सामाजिक बांधिलकी आणि दानाचा सुंदर संगम
ड्रॅगन पॅलेस टेम्पल हे केवळ एक धार्मिक केंद्र नसून सामाजिक समता, बंधुभाव आणि प्रबोधनाचे ऊर्जास्थान ठरले आहे. समाजातील वंचित व गरजू घटकांना बळ देण्यासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्रयत्नांची यावेळी उपस्थितांनी प्रशंसा केली.
पुज्य भिक्खुणी साक्य धम्मदिन्ना अयाजी यांच्यासह पुज्य भदंत मेत्तानंद महाथेरो, पुज्य भदंत उपीयरत्न महाथेरो म्यानमार, पुज्य भदंत अगधम्मा, पुज्य भदंत नारादा, पुज्य भदंत ज्ञानातीलोका, पुज्य भदंत सागरा कुशीनगर उत्तर प्रदेश यांनी महाउपासिका मॅडम नोरीको ओगावा यांच्या सातव्या स्मृति दिनानिमित्त महापरित्राण पाठ घेवून धम्मदेसना दिली.
या वेळी अजय कदम, उदास बंसोड,दिपंकर गणविर,दिनेश बंसोड, रवि रंगारी, भिमराव फुसे, अरविंद वाळके, विशवपाल चंदनखेडे, राहूल बागडे, सुभाष सोमकुवर, अंकुश बांबोर्डे ,अविनाश उकेश, रमेश घरडे, अशोक रंगारी, विष्णु ठवरे, अनुभव पाटील, चंदु लांजेवार, संदीप कांबळे, आकाश भोकरे, नरेश वासनिक, निरज लोणारे, प्रमोद खोब्रागडे, मंगेश लांजेवार,विनय बांबोर्डे, विलास बंसोड, देवेंद्र जगताप, राजेश गजभिये, विनोद जुमडे, दिलीप बोबडे, प्रफुल वासे, विजय अलोने, शालिग्राम अडकने, सुकेशीनी मुरारकर, नंदा गोडघाटे, रेखा भावे, रजनी लिंगायत, वंदना भगत, जया पानतावने, रत्नमाला मेश्राम, विशाखा कांबळे, किरण राऊत, सिमा सोमकुवर, छाया गाडगे, अस्मिता बागडे, अल्का तांबे, प्रतिभा वासनिक, वर्षा राऊत, सुभदा राऊत, रजनी गजभिये, रेखा पाटील, उषा भावे, शिल्पा नागदेवे, देवांगना गजभिये, इंदिरा खांडेकर ईत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
हा मंगल सोहळा यशस्वी करण्यासाठी ओगावा सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र, हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था, ड्रॅगन विपश्यना मेडिटेशन सेंटर, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल तसेच ओगावा इंटरप्रायजेस प्रा. लि. च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या उपासक-उपासिकांनी महापरित्राण पाठाचा व धम्मदेशनेचा लाभ घेत कुशल कर्माचे संचित केले.
श्रद्धा, कृतज्ञता, दानशीलता आणि ‘अत्त दीप भव’ या बुद्ध संदेशाचा प्रत्यक्ष प्रत्यय घडविणारा हा सोहळा अत्यंत उत्साहात संपन्न झाला.





