किशोर साहू, मौदा :- अरोली – कोदामेंढी जि प क्षेत्रातील गट ग्रामपंचायत इंदोरा अंतर्गत येत असलेल्या इंदोरा व इंद्रपुरी येथील ग्रामस्थांकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही मंगळवार (ता. २० ऑक्टोबर)ला सायं. ४ ते रात्री १० वाजेपर्यंत इंदोरा येथील दसरा मैदानात भव्य दसरा महोत्सव चे आयोजन केले आहे.
याप्रसंगी भव्य दुर्गामाता विसर्जन मिरवणूक, आकर्षक धार्मिक व सांस्कृतिक झाकी, भव्य रावण दहन व दसरा उत्सव सोहळा हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण राहणार आहे.
या भव्य दसरा महोत्सवाचे लाभ घेण्याचे आव्हान इंदोरा व इंद्रपुरी येथील समस्त ग्रामवासियांनी गावातील, परिसरातील, तालुक्यातील , जिल्ह्यातील, राज्यातील व देशातील नागरिकांना केले आहे.








