Home Latest News निमखेडा येथे कलाकारांच्या भव्य मेळावा

निमखेडा येथे कलाकारांच्या भव्य मेळावा

0
64

किशोर साहू, मौदा :- शनिवार (दि. 25 ऑक्टोबर) ला निमखेडा येथे कलाकारांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेळाव्याचे उद्घाटन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी केले. अध्यक्षस्थान राष्ट्रीय कला मंच अध्यक्ष राजेंद्र बावनकुळे यांनी भूषविले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी जि प सदस्य नंदा लोहबरे, प्रमोद बरबटे, भूमेश्वर चाफले, निमखेडा सरपंचा सुनीता यांगटी ,ज्ञानेश्वर चौरे ,प्रकाश पल्लेवार गिरीधर हारोडे, विनायक घाटबांधे, सुब्बाराव पाचुरी उपस्थित होते.

मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मेळाव्याचे आयोजक मौदा तालुका शिवसेना शाखा सचिव विनायक महादुले, दिगांबर महादुले ,रेखा दोरखंडे ,नरेश महादुले, नानवटकर गुरुजी ,मनोज झाडे, विनोद बिसेन, ललींद्र लांजेवार, शारदा भजन मंडळ, वैष्णवी भजन मंडळ, हनुमान भजन मंडळ, जय बजरंग भजन मंडळ, बाल शारदा भजन मंडळ यांचे सहकार्य लाभले. तर महिला मंडळी महादुले, बोपचे, टेंभरे, हारोडे, वाघ सह पुरुष मंडळी पंधरे ,मेश्राम व समस्त निमखेडावासियांनी सहकार्य केले.