spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सासन रामापूर या गावामध्ये श्रावण सोमवार यात्रेनिमित्त भव्य आरोग्य शिबिर

– ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबरला दोन दिवसीय आरोग्य तपासणी; भाविकांसह ग्रामस्थांनी लाभ घेण्याचे संस्थानचे ट्रस्टी व आयोजकांचे आवाहन

अमरावती :- शासनमान्य ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र श्री. भोगेश्वर महाराज संस्थान, सासन रामापूर, ता. दर्यापूर, जि. अमरावती येथे तिसऱ्या श्रावण सोमवार यात्रा महोत्सवानिमित्त दि. ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर २०२६ रोजी दोन दिवसीय भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आमदार तथा विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष रवी राणा आणि खासदार व भाजपा नेत्या नवनीत रवी राणा यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून तसेच उमेश ढोणे यांच्या पाठपुराव्यामुळे हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

यात्रा महोत्सवासाठी येणाऱ्या भाविकांसह परिसरातील नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, हा शिबिराचा मुख्य उद्देश आहे. परिसरातील नागरिकांनी तसेच यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक व संस्थानच्या ट्रस्टी गावातील गावकरी स्वयसेवी पदाधिकारी वतीने करण्यात आले आहे.त्या मध्ये अध्यक्ष संजय काळे, सचिव शहादेव मेहरे, सरपंच प्रा. विनोद सोनवणे, उपसरपंच रविंद्र पाचपोहे यांच्यासह बबनराव पाचपोहे, अमोल कोरडे, गोपाळराव ढोणे, गजानन वानखडे, राहुल सोनवणे, आकाश सोनवणे, शुभम ढोणे, विकी गुरव, आकाश नांदुरकर, यश शामतमकर, पप्पू शांमतकर, देवीनंद जावरकर, वैभव जावरकर, दिनेश गिरे, निवृत्ती ढोणे,रुपेश काळे, गजानन सोळंके, सुरेश सुभाष सोळंके, मंगेश पुरी, मोहित चौबे, अमोल काळबांडे, अमर घाटे आदींनी आरोग्य शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य करून सहभागी होणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले जात आहे.नागरिकांनी व भाविकांनी शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

“आरोग्य हीच खरी संपत्ती” या संदेशातून आयोजित या आरोग्य शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.