spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भटक्या कुत्र्यांच्या तावडीतून जखमी हरिणाची सुटका

– खापा सर्पमित्र व वनविभागाच्या पथकाची तत्परता; उपचारासाठी नागपूरला रवाना

खापा, वार्ताहर :- आनंद सागर बार परिसरातील हर्षल लांजेवार यांच्या शेतात भटक्या कुत्र्यांनी एका हरिणावर हल्ला करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात हरिण गंभीर जखमी झाले होते. मात्र, शेतात उपस्थित असलेल्या हर्षल लांजेवार यांनी प्रसंगावधान राखत कुत्र्यांना हुसकावून लावत हरिणाचे प्राण वाचविले. त्यानंतर खापा येथील सर्पमित्र आणि वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून जखमी हरिणाची सुटका केली.

शनिवार, (दि. २९) रोजी ही घटना घडली. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात हरिणाच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. हर्षल लांजेवार यांनी घटनेची माहिती तत्काळ सर्पमित्र प्रेम खडसे यांना दिली.

माहिती मिळताच सर्पमित्र विशाल शेंडे, हर्षल मोहटे, प्रेम खडसे, सौरभ शेंडे, वरुण वाघमारे व स्वप्निल देशमुख यांनी विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची माहिती वनविभागाला देण्यात आली.

खापा वनपरीक्षेत्र अधिकारी विजय गंगावने यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहाय्यक संदीप चौधरी, वनरक्षक कुकलारे, गोविंद मेंढे, वाहनचालक पंकज कोल्हे तसेच सर्पमित्रांच्या पथकाने संयुक्तपणे रेस्क्यू मोहीम राबवून जखमी हरिणाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.

जखमी अवस्थेतील हरिणाला पुढील उपचारासाठी नागपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये नेण्यात आले. वनविभाग आणि सर्पमित्रांच्या तत्परतेमुळे गंभीर जखमी झालेल्या हरिणाला वेळीच उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.

वन्यजीव संकटात सापडल्यास नागरिकांनी स्वतःहून त्याला हाताळण्याऐवजी तातडीने वनविभाग किंवा प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.