spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

तारसा येथे स्व.गोपालराव लोहबरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर

किशोर साहू, मौदा :- आरोग्याची काळजी घेणारा समाजच सक्षम समाज घडवतो आणि रक्तदानाचा एक थेंब कुणाच्यातरी आयुष्याला नवी आशा देतो, हे उदात्त हेतू ठेवून आज बुधवार (ता.१९ ऑगस्ट) रोजी श्री साईश्वर हॉल, तारसा येथे स्व. गोपालराव लोहबरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्व. गोपालराव लोहबरे बहुउद्देशीय शिक्षण संस्था, तारसा यांच्या वतीने भव्य आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी राज्यमंत्री ॲड आशिष जयस्वाल , माजी महिला व बालकल्याण जि. प. नागपूर सभापती नंदा गोपाल लोहबरे, भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण रामटेक विरेंद्र पायतोडे, माजी सदस्या, पं. स. मौदा कीर्ती वीरेंद्र पायतोडे, सरपंच ग्रा. पं. तारसा वैशाली आनंद लेंडे, उपसरपंच, ग्रा. पं. तारसा चंद्रशेखर गभने,महेश हटेवार,शुभम गभने,विकास झाडे,अरुण फुले,राहुल सोमनाथे,प्रदीप राऊत, विनायक महादुले, राकेश चव्हाण तसेच ग्रामपंचायत सदस्यगण, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आरोग्यसेवा, रक्तदान आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून समाजहिताचा हा प्रेरणादायी उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याने स्व. गोपालराव लोहबरे यांच्या सामाजिक कार्याच्या स्मृतींना हीच खरी आदरांजली असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

Popular Articles