spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चाचेर येथे आज भव्य एक दिवसीय कबड्डी स्पर्धा

किशोर साहू, मौदा, ता. १८ :- चाचेर येथे 15 जानेवारीपासून मंडई उत्सव सुरू असून त्याच्या समारोप उद्या रविवार (दि. 18 जानेवारी)ला जय बजरंग क्रीडा मंडळ तर्फे हनुमान मंदिर जवळच्या पटांगणावर भव्य एक दिवसीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करून करण्यात येणार आहे.

या कबड्डी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक माजी जि प सदस्य कैलास बरबटे यांच्याकडून दहा हजार व सामाजिक कार्यकर्ता शंकर बावनकुळे यांच्याकडून पाच हजार असे एकूण पंधरा हजार रुपये व आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संजू वाघमारे यांच्यातर्फे दहा हजार रुपये व आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक माजी उपसभापती खेमराज छाफले यांच्याकडून पाच हजार रुपये व आकर्षक चषक विजेता संघाला देण्यात येणार आहे. ग्रामपंचायत निमखेडा माजी सरपंच प्रमोद बरबटे यांच्याकडून मंडळास वीस ट्रॅक सूट देण्यात येणार आहे तसेच गावातील, परिसरातील, तालुक्यातील ,जिल्ह्यातील मान्यवरांकडून विशेष सहयोग देण्यात येणार आहे.

तरी या भव्य एक दिवसीय कबड्डी स्पर्धेच्या लाभ घेण्याचे आव्हान खेळाडूंना जय बजरंग क्रीडा मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Popular Articles