spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर डॉ. अविनाश दयाराम करंभे यांच्या “बाल मानस शास्त्र” पुस्तकाचे भव्य प्रकाशन

नागपूर :- आयुर समग्र: 2026 या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात आयुर्वेद क्षेत्रातील बालरोग चिकित्सक, अभ्यासक व लेखक डॉ. अविनाश करंभे यांच्या “बाल मानस शास्त्र” या अकराव्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. या ग्रंथाचे प्रकाशन Dr. Manisha Kothekar (अध्यक्षा, National Commission for Indian System of Medicine), Dr. Jayant Deopujari (माजी अध्यक्ष, NCISM), Dr. Milind Suryawanshi (संचालक, Central Council for Research in Ayurvedic Sciences), Dr. Jyotishi, Dr. Mukund Dive (संचालक, BMAM Nagpur), Dr. Madhusudan Gupta (प्राचार्य, BMAC Nagpur) तसेच Dr. Yuwaraj Kale (प्राचार्य, BMAM नागपूर) यांच्या हस्ते करण्यात आले.

“बाल मानस शास्त्र” या पुस्तकामध्ये आधुनिक व आयुर्वेदाच्या तत्त्वांवर आधारित बालकांच्या मानसिक आरोग्याचा, व्यक्तिमत्त्व विकासाचा तसेच संस्कारक्षम वयातील मानसिक जडणघडणीचा सखोल अभ्यास मांडण्यात आला आहे. हे पुस्तक आयुर्वेद क्षेत्रातील विद्यार्थी, संशोधक आणि चिकित्सक यांच्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

परिषदेच्या निमित्ताने देश- विदेशातील आयुर्वेद तज्ञ एकत्र आले असून आयुर्वेदाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध शैक्षणिक सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. हे पुस्तक मुलांच्या मानसिक, भावनिक आणि बौद्धिक विकासाचे टप्पे सोप्या भाषेत समजावून सांगते. त्यामुळे पालकांना मुलांचे वर्तन, हट्ट, भीती, अभ्यासातील अडचणी, स्क्रीन व्यसन, भावनिक चढ-उतार यामागील कारणे समजून घेता येतात. यामध्ये योग्य पालकत्व पद्धती, संवाद कौशल्य, सकारात्मक शिस्त, आत्मविश्वास वाढविण्याचे मार्ग आणि संस्कारांची जडणघडण याबाबत व्यावहारिक मार्गदर्शन दिलेले आहे. मुलांसाठी हे पुस्तक आत्मओळख, भावनांचे व्यवस्थापन, चांगल्या सवयी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त ठरते. एकंदरीत, ‘बाल मानस शास्त्र’ हे पुस्तक सुसंस्कृत, आत्मविश्वासी आणि मानसिकदृष्ट्या सक्षम पिढी घडविण्यासाठी प्रभावी मार्गदर्शक आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.