spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वृक्षारोपणाच्या महाअभियानाला प्रारंभ

– राज्यपालांच्या हस्ते लोकभवन येथे वृक्षारोपण

नागपूर :-  पर्यावरण संवर्धानासह नागपूरला हिरव्या आच्छादनाने संपन्न करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या वृक्षारोपण महाअभियानाचा शुभारंभ राज्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते शनिवारी (ता. १) करण्यात आला.

सदर स्थित लोक भवन परिसरात राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्यासह कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महापौर निता ठाकरे, राज्यसभा सदस्य खा. माया इवनाते आमदार मोहन मते, आ. प्रवीण दटके, उपमहापौर  लिला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दाणी वखरे, सत्तापक्षनेते  नरेंद्र(बाल्या) बोरकर, नासुप्र सभापती संजय मीना, मनपा आयुक्त डॉ. विपीन, प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. श्रीनिवास राव, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, माजी महापौर दयाशंकर तिवारी, मॉईलचे सीएमडी विश्वनाथ सुरेश, वेकोलीचे सीएमडी हेमंत पांडे, ग्रीन फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश वटे यांच्यासह इतर मान्यवरांनी हस्ते वृक्षारोपण केले. अभियानांतर्गत लोकभवन परिसरात १० हजार वृक्षांचे वृक्षारोपण केले जाणार आहे. 

नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, जिल्हा प्रशासन, नागपूर जिल्हा परिषद, वन विभाग व ग्रीन फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने नागपूर शहरासह जिल्ह्यात १ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या अभियानांतर्गत शहरात ५ लक्ष व जिल्ह्यात ५ लक्ष असे एकूण १० लक्ष वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

याचाच शुभारंभ भागातील लोकभवनात येथे झाला. याप्रसंगी डीसीएफ नागपूर डॉ. विनिता व्यास, डॉ. भारतसिंह हाडे, मनपाचे अतिरिक्त आयुक्त मुरुगनंथम एम, मिलिंद मेश्राम, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण माहिरे, सुरेश बगळे, नगरसेविका दर्शनी धवड, मंगला खेकरे, लक्ष्मी यादव, दिव्या धुरडे, संतोषदेवी लढ्ढा, धनश्री देशपांडे, योगिता तेलंग, पूजा पाठक, नगरसेवक सर्वश्री. श्रीकांत आगलावे, विजय होले, अभिजीत झा, ग्रीन फाउंडेशनचे सचिव निशांत गांधी, मनपाचे उपायुक्त सर्वश्री. गणेश राठोड, अमोल चोरपगार, अधिकारी  प्रशांत सोनकुसळे, संजय गुजर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नागपूर शहराला सुंदर व हरित साकारण्यासाठी प्रशासनाला विविध संस्थांचे सहकार्य लाभले आहे. वृक्षारोपणासाठी वन विभागाद्वारे ५ लाख वृक्ष दिले जाणार आहे. तर रायसोनी समूहातर्फे १ लाख वृक्ष दिले जाणार असून, पर्यावरण तज्ञ डॉ. चिंचमालतपुरे यांच्याकडून ५० हजार वृक्ष, व मॉईलचे आणि वेकोली यांच्या अर्थसहाय्य मिळणार आहे. नागरिकांनी देखील या महाअभियानात मोठ्या संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाद्वारे करण्यात येत आहे.

अभियानांतर्गत या झाडांची होणार लागवड

लोक भवन परिसरात वड, उंबर, पिंपळ, बेल, चिंच, कडूनिंब, कदंब, खिरणी, बकुळ, कवठ, आवळा, महुआ, जांभूळ, आंबा, चिकू, अंजीर, अमलतास,बोर,,काटसावर, करंजी, पळस, जारूळ. आपटा, महारुख, शिरीष,सिसम, आजन, अर्जुन असे वृक्ष लावण्यात येणार आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.