spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपातर्फे क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

नागपूर :- भारतीय स्वातंत्र्य लढयात प्रतिसरकार हा समांतर शासनाचा प्रयोग करुन ग्रामीण जनतेत स्वातंत्र्य मुल्य रुजविणारे क्रांतीकारक आणि बहुजन समाजाला विकासाकडे नेण्याचा सक्रियतेने प्रयत्न करणारे नेते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले.

मनपा मुख्यालयातील महापौर कार्यालयापुढील दालनात सोमवार (ता.३ ऑगस्ट) रोजी उपायुक्त राजेश भगत यांनी क्रांतीसिंहाचे छायाचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अमोल तपासे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

Popular Articles