नागपूर :- संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.
विभागीय आयुक्त कार्यालयातील नितीन डोईफोडे, गजानन भोपाळे, अमित हाडके, कविता फाले-बोरीकर आदी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.








