spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

पोलीस स्टेशन केळवद हद्दीतील घटना, कपिलेश्वर डोहात बुडुन १७ वर्षीय तरुणाचा मुत्यु

– नागपुर कळमना येथुन ट्रैवल्स बसने आले होते पिकनिककरिता

खापा :- स्थानीक कपिलेश्वर मंदिर परिसरात परिवारासोबत पिकनिकसाठी आलेल्या यश भोलाशंकर राठोड (वय १७, रा.कळमना, नागपुर) याचा डोहात बुडुन मुत्यु झाला. कपिलेश्वर मंदिर येथे मृतक यश राठोड व त्याचा परिवार दि. ३१ शनिवारच्या दुपारी १:३० वाजता पिकनिककरिता आलेले होते. मृतक यश राठोड याला पोहता येत नसतांना सुध्दा त्याने डोहात उडी मारली. कपिलेश्वर मंदिर येथील हरी महाराज व त्याच्या परिवारातील महिलांनी त्याला वाचविण्याकरिता प्रयत्न केले. परंतु मृतक यशला वाचविण्यात अपयश आले. केळवद ठाणेदार आशिषसिंह ठाकुर, होमगार्ड अतुल कोल्हे यांनी सुद्धा पाण्यात उतरुन मृतकाला वाचविण्याकरिता प्रयत्न केले. शेवट मृतक यशला डोहातुन बाहेर काढण्यात आले. त्याच्यावर प्रथम उपचार करुन त्वरीत हितेश बंसोड यांच्या रुग्णवाहीनीने सावनेर सरकारी रुग्णालयात पोहचविले. डॉक्टरांनी तपासणी करुन यश राठोड याला मृत घोषित केले. पुढील तपास हवालदार सुधिर यादगिरे करीत आहे. मृतक यशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.

Popular Articles