कामठी :- गेल्या काही वर्षांत कामठी तालुक्यातील आजनी येथे माजी पंचायत समिती सभापती आणि विद्यमान सदस्य उमेश भाऊ रडके यांच्या अथक प्रयत्नांनी व पुढाकाराने हनुमान मंदिर जीर्णोद्धार, गणपती मंदिर जीर्णोद्धार, गावातील रस्ते, बाजार चौक, ग्राम पंचायत, जिल्हा परिषद शाळा, वाचनालय, अंगणवाडी इमारत यांसारखी गावातील अनेक विकासकामे झाली आहेत. या विकासकामांसाठी कामठी क्षेत्राचे विद्यमान आमदार आणि महसूल मंत्री विकासपुरुष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेहमी मुक्तहस्ते निधी पुरविलेला आहे. तसेच या विकासकामांत माजी आमदार टेकचंद सावरकर, माजी जि. प. सदस्य मोहन माकडे, विरोधी पक्षनेते जि. प. अनिल निधान यांनी विशेष सहकार्य केले आहे.
गावातील अशाच विकासकामांच्या यादीत नव्याने बाजार चौकातील सभामंडपाचे नाव समाविष्ट झाले असून जीर्ण झालेल्या जुन्या सभामंडपा ऐवजी नवीन सभामंडप बांधण्यासाठी आमदार निधीतून विकास निधी आणण्यात उमेश भाऊ रडके यांना पुन्हा एकदा यश मिळाले आहे.
या नूतन सभामंडपाचे भूमिपूजन नुकतेच मंगळवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी पंचायत समिती सदस्य उमेश भाऊ रडके यांच्या हस्ते पार पडले. गावाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा संकल्प यावेळी उमेश भाऊ रडके यांनी व्यक्त केला असून आजनी गावच्या विकासासाठी आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचे सहकार्य नेहमीच लाभत असल्याने त्यांच्यासह सर्व निधी पुरविणाऱ्या प्रतिनिधींचे आभार सुद्धा त्यांनी यावेळी मानले.
या भूमिपूजन प्रसंगी माजी जि. प. सदस्य भगवंतराव रडके, माजी सरपंच तुकाराम लायबर, प्रभाकर देशमुख, विद्यमान उपसरपंच हेमराज दवंडे, पोलिस पाटील बळवंत रडके, माजी उपसरपंच पुरुषोत्तम देशमुख, ग्राम पंचायत सदस्य गणपत झलके, अंकिता हेटे, हेमलता उकेबोंदरे, शंकर भोयर यांच्यासह गावातील नागरिक शिवशंकर वांढरे, बळवंतराव नेऊलकर, सोमाजी नागोसे, कवडू चिंचुलकर, नामदेव ढोक, डोमाजी पाटील, श्याम भोयर, सुधाकर विघे, प्रशांत घोडे, नरेश जीवतोडे, दिवाकर नागोसे, सूर्यभान हेटे, खुशाल विघे, कृष्णा नारनवरे, जयराम चौधरी, शेषराव भोयर, गोपीचंद पाटील, गरमडे बाबू, रवी मानकर, मनोहर हेटे, जगदीश शाहू, विष्णू उकेबोंदरे, प्रदीप खंडाते अशा शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.





