spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पालकमंत्र्यांच्या हस्ते दारव्हा येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन

– दर्जेदार सुविधा निर्मितीसाठी राज्य शासन कटीबद्ध – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ :- सभागृह, जॉगिंग ट्रॅक यासह सुमारे तीन कोटी निधीतून विविध विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते दारव्हा येथे आज झाले. नागरिकांसाठी दर्जेदार व गुणवत्तापूर्ण सुविधांची निर्मिती करण्यासाठी शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन मंत्री राठोड यांनी यावेळी केले.

दारव्हा शहरातील नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक ३ मधील विवेकानंद कॉलनीत विविध विकासकामांच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात भूमिपूजन विधी पार पडला. या कामांमध्ये विवेकानंद कॉलनीतील खुल्या जागेत सभागृहाचे बांधकाम (₹70 लाख), त्याच ठिकाणी जॉगिंग ट्रॅक बसविण्याचे काम (₹10 लाख), तसेच यवतमाळ रोड ते आर्णी नाका दरम्यान खडीकरण व नाली बांधकाम (₹1,59,17,409) आणि नगरपरिषद प्रभाग क्रमांक ३ मधील ग्रामसेवक कॉलनी येथील बायपास रोड ते अश्विन नगरपर्यंत नाली बांधकाम (₹47 लाख) यांचा समावेश आहे. या सर्व विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते आज झाले.

या प्रसंगी ज्येष्ठ नेते जीवनदादा पाटील, संपर्कप्रमुख श्रीधर काका मोहोड, जिल्हाप्रमुख यशवंत पवार, मुख्याधिकारी नगरपरिषद दारव्हा विठ्ठल केदारे, तालुका प्रमुख मनोज सिंगी, शहर प्रमुख राजू दुधे, नायब तहसीलदार जाधव आणि गजेंद्र चव्हाण यांसह शिवसेना पदाधिकारी व स्थानिक नागरिक उपस्थित होते.

नियोजित विकास कामे दर्जेदार गुणवत्तापूर्ण व्हावीत. इतर आवश्यक कामांसाठीही प्रस्ताव सादर करावेत. जिल्ह्याला विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री राठोड यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणावर नागरिक उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.