spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

 

योग परिवाराने गुरु-शिष्य परंपरेचे जतन

सावनेर १२ : पारंपरिक गुरु-शिष्य परंपरेचे स्मरण आणि गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या पवित्र उद्देशाने, गुरुपौर्णिमेनिमित्त १० जुलै रोजी सावनेर येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात योग परिवार सावनेरच्या वतीने विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी भारताच्या प्राचीन योग परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत योग शिक्षकांनी उपस्थितांना योगाचे विविध पैलू समजावून सांगितले. शारीरिक तंदुरुस्ती मिळवण्यासाठी प्राचीन योग, व्यायाम, प्राणायाम, आसने, हठयोग, क्रिया, तसेच मानसिक आरोग्यासाठी राजयोग, ध्यान आणि संज्ञानात्मक प्राणायामाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पतंजली योगपीठ, हरिद्वार येथून प्रशिक्षित प्रमुख योग शिक्षक किशोर धुंडले यांनी केले. त्यांनी उपस्थितांना भस्त्रिका, कपालभाती, बाह्य प्राणायाम, उज्जयी, अनुलोम-विलोम, भ्रामरी यांसारख्या प्राणायामांचे तसेच ताडासन, वृक्षासन, पक्षासन, वज्रासन, शशांकासन, मंडूकासन, सर्वांगासन अशा विविध आसनांचे प्रात्यक्षिकाद्वारे महत्त्व समजावून सांगितले.

धुंडले म्हणाले, “एक दिवस योग केल्याने लाभ होणार नाही. तो दैनंदिन जीवनशैलीचा एक भाग बनवावा लागतो. दररोज किमान अर्धा तास स्वतःसाठी वेळ देत योग आणि प्राणायाम केल्यास आपण आणि आपले कुटुंब निरोगी राहू शकते. त्यातून नकारात्मक विचार दूर राहतात आणि दिवसभर उर्जा मिळते.”

कार्यक्रमात सर्व उपस्थितांना प्रात्यक्षिकासह व्यायाम, प्राणायाम आणि ध्यान करायला लावण्यात आले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश दलवाई, शैलेश बांबळ, अशोक आठवले, चावडे , विनोद काळे, शुभम ढवळे, शिवा सोमकुवर, कविता पिसे, सुमन तभाने, खटिक ताई, आशा धुंडले, खांडेकर , वैशाली साबळे, स्वाती ठाकरे, शिल्पा पिसे, सविता गजभिये, सीमा सरोदे, प्रमोदिनी ताई, प्रिया भोयर, माधुरी बागडे, मुसळे यांच्यासह इतर अनेक कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमात योग परिवार सावनेर व महिला पतंजली परिवाराचे असंख्य सदस्य, माता-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी अत्यंत उत्साहाने आणि भक्तिभावाने गुरुपौर्णिमा साजरी केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.