– अवकाळी वादळी पाऊस गारपिट नुकसानीची तत्काळ मदत जाहीर करा – माजी आमदार देवेंद्र भुयार
– देवेंद्र भुयार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी !
वरूड तालुका प्रतिनिधी :- वरूड तालुक्यामध्ये दिनांक ३० मे रोजी झालेल्या वादळी अवकाळी पावसामुळे व गारपीटीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे आंबिया बहार संत्राच्या हजारो हेक्टर क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून संत्रा मोसंबी भाजीपाला यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे वरूड तालुक्यातील वादळी अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन तात्काळ अनुदान वाटप करण्याबाबत मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करून तत्काळ पंचनामे करून नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांना दिले असल्याची माहिती माजी आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी दिली.

वरुड तालुक्यात दिनांक ३० मे रोजी दुपारी ४ वाजता दरम्यान गारांचा वर्षाव व अवकाळी वादळी वा-यासह पाऊस झालेला आहे. सदर झालेल्या गारांमुळे व वादळी वा-यासह पावसामुळे शेतक-यांचे गहू, हरबरा इत्यादी पिकांचे तसेच संत्रा व मोसंबी इत्यादी फळ पिंकांचे आंबीया बहाराचे प्रचंड नुकसान झालेले आहे. व त्यामुळे शेतकरी अत्यंत आर्थिक अडचण आलेला आहे.
वरूड तालुक्यात अवकाळी वादळी पाऊस व गारपिटीमुळे संत्रा मोसंबी यासह विवीध शेती पिकांच्या झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करुन शेतक-यांना तातडीने मदत करण्यासाठी संबधितांना निर्देश देऊन झालेल्या शेतीपिकांचे नुसानीचे पंचनामे करून तसा अहवाल शासनाकडे तात्काळ सादर करून नुकसान ग्रस्त शेतक-यांना तातडीने अनुदान वाटप करावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
– माजी आमदार देवेंद्र भुयार



