spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गट ग्रामपंचायत खंडाळा (घटाटे) येथे आनंदाचा शिधा… दिवाळीचा गोडवा गरजूंच्या घरी! 

किशोर साहू,मौदा :- शिवसेना परिवाराच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या संकल्पनेतून आनंदाच्या शिधा… दिवाळीच्या गोडवा गरजूंच्या घरी! हा उपक्रम संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. मौदा तालुक्याच्या सीमेवर स्थित पारशिवनी तालुक्यांतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत खंडाळा (घटाटे) अंतर्गत येणाऱ्या खंडाळा (घटाटे) व गहूहिवरा या गावात माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल बोरकुटे यांच्या नेतृत्वात हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमाच्या माध्यमातून दुष्काळाचे सावट असलेल्या कष्टकरी, अपंग, विधवा आणि गरजू बांधवांची दिवाळी गोड करण्याच्या हा प्रयत्न आहे. सणाच्या आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर खुलावा आणि प्रत्येकाच्या घरात आनंदाचा दीप उजळावा, बळीराजाची दिवाळी गोड व्हावी हाच या उपक्रमामागील प्रामाणिक हेतू व हीच मनापासून इच्छा असल्याचे सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल बोरकुटे यांनी सांगितले.

Popular Articles