spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दप्तरातून चाकू काढून मित्रावर वार

नांदेड :- सोशल मीडियावरील रील्स आणि व्हिडिओचा अल्पवयीन मुलांवर किती घातक परिणाम होत आहे, याची प्रचिती देणारा एक धक्कादायक प्रकार नांदेडमधील असर्जन येथे उघडकीस आला आहे. एकाच वर्गात शिकणाऱ्या दहावीच्या दोन विद्यार्थ्यांनी क्षुल्लक वादातून आपल्याच वर्गमित्रावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची थरारक घटना घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थ्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

असर्जन येथील एका शाळेत इयत्ता दहावीत शिकणाऱ्या 15 ते 16 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आपसात किरकोळ कारणावरून वाद सुरू होता. याच वादाचा राग मनात धरून दोन विद्यार्थ्यांनी घरातून निघतानाच आपल्या शाळेच्या दप्तरात चाकू आणला होता.

शाळेची जेवणाची सुटी होताच या दोघांनी संबंधित वर्गमित्राला फूस लावून शाळेच्या शेजारी असलेल्या मंदिराच्या पाठीमागे नेले. तिथे त्यांच्यात पुन्हा बाचाबाची झाली आणि राग अनावर झालेल्या दोघांनी दप्तरातून चाकू काढून वर्गमित्राच्या थेट गळ्यावर आणि पोटात सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या विद्यार्थ्याचा आरडाओरडा ऐकून शाळेतील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली

Popular Articles