खापा, वार्ताहर :- स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने खापा (ता. सावनेर) नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागात कार्यरत असलेल्या सफाई कामगार व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. यात कंत्राटी तसेच शहरात घनकचरा गोळा करणाऱ्या कामगारांचा समावेश होता.
नगर परिषदद्वारे स्वच्छ भारत अभियान व माझी वसुंधरा अभियान जनजागृती अंतर्गत प्रत्येक ३ महिन्याने आरोग्य शिबिर राबविण्यात येते. या शिबिरला नगराध्यक्ष पीयूष बुरडे, उपाध्यक्ष सुनील पाहुणे, सर्व सभापती, नगरसेवक, नगरसेविका तसेच पालिकेचे मुख्याधिकारी सचिन राऊत यांच्या मार्गदर्शनात तसेच स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राहुल चव्हाण, स्वच्छता निरीक्षक प्रदीप परतेती प्रशासकीय अधिकारी वैभव गोळे, सिटी को-ऑर्डिनेटर राहुल बावनकुळे यांच्या नेतृत्वात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. दर्शन माहूरकर व यांची टीम, गोदरेज फिडबॅक फाउंडेशनचे व्यवस्थापक जितेंद्र पासवान यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांच्या विविध चाचण्या करून आरोग्य तपासणी केली. या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची आता दर तीन महिन्यांनी नियमित तपासणी केली जाणार असल्याचे स्वच्छता निरीक्षक प्रदीप परतेकी यांनी सांगितले. यावेळी तिलक नकाशे, पवन सदावर्ती, सचिन कोल्हे, हर्षा पौणीकर, सुरक्षा तितरे, प्रदीप रेवतकर, सेजल धनोरे, मीनाक्षी पराते, पूजा इटनकर यांच्यासह नगरपरिषद कर्मचारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.








