– आमदार रवी राणा यांचा पुढाकाराणे समन्वयक उमेश ढोणे यांची उपस्थिती
नागपूर :- जिल्हा परिषद आरोग्य सेविका, एलएचव्ही तसेच अन्य संवर्गांच्या प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात आरोग्य संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आज सार्वजनिक आरोग्य सेवा विभागाचे संचालक डॉ. अंबाडेकर यांना सविस्तर निवेदन सादर केले. निवेदनातील मुद्द्यांवर चर्चा ऐकून आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. ही पुढाकार प्रक्रिया विधानभवनातील विधानसभा आश्वासन समितीचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्या माध्यमातून राबविण्यात आली त्यांचे सचिव उमेश ढोणे यांनी समन्वय केला.
निवेदनात एनपीएस रद्द करणे, एलएचव्ही पद पुनर्स्थापना, विना प्रशिक्षण पदोन्नती, प्रवास भत्ता वाढ, तसेच कोविड काळातील सेवेला योग्य मान्यता या महत्त्वाच्या मागण्यांचा समावेश असून, या सर्व मागण्या तत्काळ निकाली काढाव्यात, अशी संघटनेची भूमिका आहे.
सदर निवेदनावर राज्य आरोग्य संघटनेच्या महिला पदाधिकारि— पुष्पा वानखडे, चंदा बेलसरे, दिपाली शिंदे, पद्मा जाधव, सुनंदा नाथे, मोनिका भोवते, सुरेखा उके, लक्ष्मी बनसोड, पूनम नांदुरकर, निकिता गणवीर, सुजाता बनसोड, वीणा चव्हाण आणि संगीता लोखंडे आदींनी संबंधित मागण्यांवर निवेदन देऊन वरीत निर्णय घेण्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.








