किशोर साहू, मौदा :- पावसाळा लागला की बळीराजा आपल्या शेतीच्या कामात व्यस्त होतो. परंतु यावर्षी कोदामेंढीसह परीसरात व संपूर्ण मौदा तालुक्यात पाहिजे तसा पाऊस पडला नसल्याने बळीराजा पहीलेच चिंतेत आहे. नदी नाल्यांना पुर पहायला मिळाला नाही. विहीरी तुडुंब भरल्या नाही.तलाव अर्ध्यावरच समाधान मानून उभे ताटकळत आहेत. पावसाळा संपला. सप्टेंबर महिना अर्ध्यावर गेला. गणरायाचे आगमन झाले. परतीच्या पावसाने हजेरी लावली.
आज शुक्रवार (ता. 18 सप्टेंबर) ला सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास विजेच्या कडकडाट सह वादळी वाऱ्याने सुरुवात केली व एक तास मुसळधार पाऊस कोसळला आणि त्यानंतर पावसाची रिप रिप सुरू झाली बातमी लिये पर्यंत पावसाची रिप रिप सुरूच होती. यामुळे बळीराजा अल्पसा सुखावला असल्याचे भासवत आहे. परंतु अजूनही नदी – नाल्यांना पूर येईल, विहिरी तुडुंब भरतील, अशा मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे, हे विशेष!





