spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हिंदी कवी आणि शायर यांचा कवी संमेलन 24 रोजी हिंदी मोरभवनात

नागपूर :- निवडक हिंदीतील कवी आणि शायर यांचे कवी संमेलन 24 ऑक्टोबर रोजी, दुपारी दोन वाजता नटराज सभागृह, हिंदी मोर भवन, बर्डी, नागपूर येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या संमेलनाची अध्यक्षता प्रसिद्ध हिंदी साहित्यिक डॉक्टर शिवनारायण आचार्य करीत आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सागर खादीवाला, माणिकराव खोब्रागडे, प्राध्यापक जावेद पाशा, शब्बीर अहमद विद्रोही, प्राध्यापिका हेमलता मिश्र मानवी, उपस्थित राहणार आहेत. या हिंदी काव्य संमेलनाचे उद्घाटन प्रसिद्ध कवित्री आणि शायरा नेहा गुडघाटे, मुंबई हे करणार आहेत. विशेष अतिथी म्हणून तन्हा नागपुरी डॉक्टर भोला सरवर, वहीद हैरा, कवी जमील अन्सारी, उपस्थित राहणार आहेत.

आमंत्रित कवी अनिल मालोकर, अविनाश बागडे , माधुरी राऊलकर, पूनम हिंदुस्तानी, रूबी दास ‘अरु”, प्रा. हृदय चक्रधर, गजभिये, रजनी संबोधी, रोशनी गणवीर, कवी शिर्के, कवी सूर्यकांत मुनघाटे, प्रभू फुलझेले, डॉक्टर पोफळे, सजय गोडघाटे, अजहर हुसेन, शमशाद शाद, जमील अन्सारी, आतिश अहमद, अख्तर आलम, माहीर नागपुरी, खुर्शीद हैदर, शहीद हजरत, लोकमान अन्सारी, अकबर खैराबादी, रहेबर नागपुरी, जकवान अन्सारी, हिफजुरहमान खान नागपुरी, आजार हुसेन, शमशाद शहाद हे मान्यवर आपली रचना सादर करणार आहेत. या संमेलनाचे आयोजन नागपुरातील मूल्य संगर साहित्य विचार मंच, हिंदी साहित्य विकास संस्था, भारतीय मुस्लिम परिषद, फुले शाहू आंबेडकर विचार मंच, छवि पब्लिकेशंस यांनी केलेले आहे.

Popular Articles