किशोर साहू, मौदा, ता.२३ :- मौदा तालुक्यातील 5 जिल्हा परिषद सर्कल व 10 पंचायत समिती गणांचे 13 ऑक्टोबरला आरक्षण जाहीर होताच , मागच्या पंचवार्षिक निवडणुकीत चाचेर – निमखेडा जिल्हा परिषद सर्कल मधून निवडून आलेले कैलास बरबटे 14 ऑक्टोंबर पासूनच त्यांच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले असून ते स्वतः निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसत आहेत. दिवाळीनिमित्त त्यांनी चाचेर – निमखेडा जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत येणाऱ्या 22 गावांमध्ये दिवाळी शुभेच्छांचे फलक लावून नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,भाजपा जिल्हाध्यक्ष ( रामटेक) आनंदराव राऊत, माजी आमदार टेकचंद सावरकर यांच्यासह इतरही भाजपच्या दिग्गजांना भेटून दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी लक्ष्मीकांत किरपान ( गुरूजी ), भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष संजू वाघमारे,महामंत्री कैलास सोमनाथे, उपसरपंच धनराज हारोडे, मोतीराम घरजाडे, विकास झाडे , केसव झाडे , शंकर बावनकुळे , आकाश गोरले, नंदू मेहर,राहुल मेश्राम उपस्थित होते.




