Home Latest News HIV/ AIDS जनजागृती सायकल रॅली संपन्न

HIV/ AIDS जनजागृती सायकल रॅली संपन्न

0
47

गडचिरोली :- 15 ऑक्टोबर 2025 रोजी, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबई यांचे आदेशानुसार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माधुरी कीलनाके यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक (DAPCU), जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली यांच्या वतीने Intensified IEC Campaign- २०२५ अंतर्गत व आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्ताने  एच.आय.व्ही./ एड्स जनजागृती उद्देशाने रेड रिबन क्लब (RRC) फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली येथील विद्यार्थ्यांच्या मार्फतीने HIV/ AIDS जनजागृतीपर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले.

रॅलीचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी कीलनाके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे तसेच कार्यकारी प्राचार्य डॉ. रूपेंद्रकुमार गौर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सकाळी 7.३0 वाजता करण्यात आले. या वेळी, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक कार्यालयातील महेश भांडेकर (DPO), डॉ. अभिषेक गव्हारे (CSO), प्रा. हितेश चरडे (NSS कार्यक्रम अधिकारी) सविता वैद्य, किशोर रामटेके, राजेश गोंडाने, निलिमा बालपांडे, विनोद कोलते, आशिष कुकडे उपस्थित होते.

रॅलीची सुरुवात फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क ते इंदिरा गांधी चौक मार्गे परत महाविद्यालयातच समारोप करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सायकलवरून एच.आय.व्ही./एड्स प्रतिबंध, युवकांचे आरोग्य, सुरक्षित जीवनशैली आणि समाजातील जबाबदारी याविषयी घोषवाक्ये देत जनजागृती केली. या उपक्रमात NSS स्वयंसेवक आणि रेड रिबन क्लब सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रॅलीचे समन्वयन जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक, गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

या निमित्ताने युवकांनी “स्वस्थ युवक – स्वस्थ समाज” आणि “ युवा सशक्तीकरणातून एच.आय.व्ही./एड्स मुक्त समाजाकडे वाटचाल ” हा संदेश समाजामध्ये पोहोचविला.