Home Latest News सावंद्री येथे शेतकरी प्रशिक्षण संपन्न

सावंद्री येथे शेतकरी प्रशिक्षण संपन्न

0
62

नागपूर :- कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्सटाइल इंडस्ट्रीज (CITI-CDRA) पुढाकाराने शेतकरी प्रशिक्षण सावन्द्री येथे १४ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी.एच.वैराळे, प्रकल्प समन्वयक, सिटी- सीडीआरए महाराष्ट्र, यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मुक्तार मन्सुरी, कृषी शास्त्रज्ञ, सिरकॉट नागपूर, संतोष टेभूरकर बि.टी.एम आत्मा कळमेश्वर, आशिष कुशवाह प्रकल्प समन्वयक, जगदीश नेरलवर प्रोजेक्ट ऑफिसर सिटी-सीडीआरए, युगांतर मेश्राम प्रोजेक्ट ऑफिसर सिटी -सीडीआरए नागपूर, डॉ तसेच प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते. गोविंद वैराळे यांनी जगात कापसाचे विशेष महत्त्व अधोरेखित करत, उत्पादकता वाढीसाठी अतीधन पद्धतीने लागवड करण्याची गरज सांगितली. तसेच सध्याच्या शेतकऱ्यांच्य परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी ऑरगॅनिक व रीजनरेटिव्ह फार्मिंग कसे उपयुक्त ठरू शकते याबाबत मार्गदर्शन केले डॉ. मुक्तार मन्सुरी यांनी कापूस पिकावर येणाऱ्या समस्या आणि त्यांचे उपाय याबाबत माहिती दिली. जगदीश नेरलवर यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन कसे मिळवता येईल, योग्य लागवड पद्धती, खतांचा वापर, गड-फांदी व फड-फांदी तंत्रज्ञान, कॉटन टेक्नॉलॉजी-२, गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण आणि फेरोमोन ट्रॅप व पिबीनॉट धाग्याचा वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. संतोष टेभूरकर यांनी एआय आधारित नवे तंत्रज्ञान, क्रॉप ऑप, स्मार्ट कॉटन प्रोजेक्ट, महाविस्तार एआय ऑप, फार्मर आयडी, कृषी संजीवनी प्रकल्प व शासकीय योजना यांचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले. भावेश शहा यांनी शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा परिपूर्ण लाभ घेऊन उत्पादन व उत्पन्न वाढवावे, तसेच जिनिंग, प्रोसेसिंग, ब्रँडिंग, मार्केटिंग आणि ट्रेडिंगचे महत्त्व पटवून दिले. आशिष कुशवाह यांनी कापसाचे मूल्यसंवर्धन, त्याचे जीवनातील महत्त्व तसेच सरकी, डंडल यापासून बायोचार, कंपोस्ट निर्मिती व श्रेडिंग याबाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना कामगंध सापळे वितरीत करण्यात आले व शेतामध्ये भेट देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी उत्तरे देऊन त्यांच्या शंका दूर केल्या. या कार्यक्रमाला शेतकरी, पायलट प्रोजेक्ट आणि कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्टचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रमाचा समारोप श्री. युगांतर मेश्राम प्रोजेक्ट ऑफिसर सिटी-सीडीआरए यांनी केला आणि सर्व मान्यवरांचे आभार मानले.