Home Latest News सावंद्री येथे शेतकरी प्रशिक्षण संपन्न

सावंद्री येथे शेतकरी प्रशिक्षण संपन्न

0

<p><strong>नागपूर &colon;- <&sol;strong>कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन टेक्सटाइल इंडस्ट्रीज &lpar;CITI-CDRA&rpar; पुढाकाराने शेतकरी प्रशिक्षण सावन्द्री येथे १४ ऑक्टोबर रोजी संपन्न झाला&period; या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जी&period;एच&period;वैराळे&comma; प्रकल्प समन्वयक&comma; सिटी- सीडीआरए महाराष्ट्र&comma; यांनी भूषविले&period; प्रमुख पाहुणे म्हणून डॉ&period; मुक्तार मन्सुरी&comma; कृषी शास्त्रज्ञ&comma; सिरकॉट नागपूर&comma; संतोष टेभूरकर बि&period;टी&period;एम आत्मा कळमेश्वर&comma; आशिष कुशवाह प्रकल्प समन्वयक&comma; जगदीश नेरलवर प्रोजेक्ट ऑफिसर सिटी-सीडीआरए&comma; युगांतर मेश्राम प्रोजेक्ट ऑफिसर सिटी -सीडीआरए नागपूर&comma; डॉ तसेच प्रगतिशील शेतकरी उपस्थित होते&period; गोविंद वैराळे यांनी जगात कापसाचे विशेष महत्त्व अधोरेखित करत&comma; उत्पादकता वाढीसाठी अतीधन पद्धतीने लागवड करण्याची गरज सांगितली&period; तसेच सध्याच्या शेतकऱ्यांच्य परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी ऑरगॅनिक व रीजनरेटिव्ह फार्मिंग कसे उपयुक्त ठरू शकते याबाबत मार्गदर्शन केले डॉ&period; मुक्तार मन्सुरी यांनी कापूस पिकावर येणाऱ्या समस्या आणि त्यांचे उपाय याबाबत माहिती दिली&period; जगदीश नेरलवर यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन कसे मिळवता येईल&comma; योग्य लागवड पद्धती&comma; खतांचा वापर&comma; गड-फांदी व फड-फांदी तंत्रज्ञान&comma; कॉटन टेक्नॉलॉजी-२&comma; गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण आणि फेरोमोन ट्रॅप व पिबीनॉट धाग्याचा वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले&period; संतोष टेभूरकर यांनी एआय आधारित नवे तंत्रज्ञान&comma; क्रॉप ऑप&comma; स्मार्ट कॉटन प्रोजेक्ट&comma; महाविस्तार एआय ऑप&comma; फार्मर आयडी&comma; कृषी संजीवनी प्रकल्प व शासकीय योजना यांचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले&period; भावेश शहा यांनी शेतकऱ्यांनी शासकीय योजनांचा परिपूर्ण लाभ घेऊन उत्पादन व उत्पन्न वाढवावे&comma; तसेच जिनिंग&comma; प्रोसेसिंग&comma; ब्रँडिंग&comma; मार्केटिंग आणि ट्रेडिंगचे महत्त्व पटवून दिले&period; आशिष कुशवाह यांनी कापसाचे मूल्यसंवर्धन&comma; त्याचे जीवनातील महत्त्व तसेच सरकी&comma; डंडल यापासून बायोचार&comma; कंपोस्ट निर्मिती व श्रेडिंग याबाबत मार्गदर्शन केले&period; शेतकऱ्यांना कामगंध सापळे वितरीत करण्यात आले व शेतामध्ये भेट देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तज्ज्ञ शास्त्रज्ञांनी उत्तरे देऊन त्यांच्या शंका दूर केल्या&period; या कार्यक्रमाला शेतकरी&comma; पायलट प्रोजेक्ट आणि कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्टचा संपूर्ण स्टाफ उपस्थित होता&period; कार्यक्रमाचा समारोप श्री&period; युगांतर मेश्राम प्रोजेक्ट ऑफिसर सिटी-सीडीआरए यांनी केला आणि सर्व मान्यवरांचे आभार मानले&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version