spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठी तालुक्यात इको फ्रेंडली वातावरणात होळी पर्व उत्साहाने साजरा

– होळी चा रंग उधळला मात्र जरा जपूनच

कामठी :- होळी हा रंग, प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून साजरा केला जाणारा लोकप्रिय आणि महत्वाचा सण आहे.हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरे केले जाते कारण तो हिरणकश्यपवर नरसिंहाच्या रुपात विष्णूच्या विजयाचे स्मरण करतो. त्यानुसार 2 मार्च ला कामठी तालुक्यात सर्वत्र होलिका दहन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

होळीचा दुसरा दिवस हा पाडव्याचा असून यंदा 3 मार्च होळीचा दुसऱ्या दिवशी पाडव्याला चांद्रग्रहण असल्यामुळे धुळवडीचा एक दिवस लांबनिवर गेला होता त्यात कुणी 3 तर कुणी चार मार्च ला रंगोत्सव साजरा केला. होळीच्या या पाडव्याला सकाळपासूनच गुलाल व रंगाची मोठ्या प्रमाणात उधळण होताना दिसली तर बालक मंडळी रंगाच्या रंगात चांगलेच रंगून होते . तर तळीरामासाठी हा दिवस मोठ्या उत्साहाचा व धुमाकूळ चा असल्याने कित्येकच कोंबड्या बकऱ्याची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली तर काहींना या उत्सवाचा आनंद पनीर ची भाजी खाऊनच समाधान मानावे लागले.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा होळी या पर्वानिमित्त कामठी तालुक्यात विविध संघटनेच्या वतीने वाईटाचा नायनाट करणे या भूमिकेतून गुरुवारी सार्वजनिक तसेच खाजगी होळी जाळून होलिकादहन कार्यक्रम साजरा करण्यात आला तर होलिका दहन झाल्यानन्तर वाईटाचा नायनाट केल्याच्या आनंदात शुक्रवार ला धुलीवंदनाचा दिवस हा आनंदाचा मौजमस्तीचा असून बुरा ना मानो होली है या म्हणीनुसार एकमेकांना रंग लावीत गुलालाची उधळण करीत धुळीवंदणाचा दिवस हा इकोफ्रेंडली व खेळीमेळीच्या वातावरणात मोठ्या उत्साहाने पार पडला. तसेच नागरिकांनी होळी चा रंग उधळला मात्र तो जरा जपूनच….

होळीचा सन म्हटला की तो आनंदाचा सन असतो सर्वच जण या सणाच्या प्रतीक्षेत असतात तर काही ठिकाणी धुळवडीच्या दिवशी मारामाऱ्या, भांडणे होत असल्याने या सनाला गालबोट लागीत असतात तर होळीच्या दुसरा दिवस धुळीवंदनाचा दिवस हा पोलिसांच्या खऱ्या परीक्षेचा दिवस असतो त्यामुळे स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या वतीने स्थानिक पोलीस अधिकारी कर्मचारी सह अतिरिक्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा ठिकठिकानी पोलीस बंदोबस्त लावून विशेष लक्ष केंद्रित करीत खबरदारी घेतली गेली तसेच वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने खबरदारी घेत विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते परिणामी हा पर्व मोठ्या उत्साहाने पार पडले.

या रंगोत्सवाच्या यशस्वीतेसाठी डीसीपी डॉ संदीप पखाले ,एसीपी अंकुश खेडकर ,वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे,वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या मार्गदर्शनार्थ नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या नेतृत्वात संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाची कर्तव्यदक्ष भूमिका साकारली.

Popular Articles