spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

प्रभाग क्र 4 ची अर्धवट रखडलेल्या पाणी टंकी योजना पूर्णत्वास केव्हा येणार – डॉ सुनील वाघमारे

कामठी :- कामठी नगर परिषद ला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियांन योजना अंतर्गत कामठी शहरात निर्माण करणाऱ्या तीन पाण्याच्या टाकी व पर्जन्य जलवाहिनी प्रकल्प हेतू चार वर्षांपूर्वी 5 मार्च 2019 ला मंजूर झालेल्या 21.82कोटी रुपयाच्या निधीतुन प्राप्त निधीतील पहिला टप्पा 5 कोटी 76 लक्ष 43 हजार शहरात तीन टंकी पाणी योजना सुरू करण्यात आली त्यानुसार कामठी नगर परिषदला प्राप्त प्रथम टप्पानुसार कामठी शहरातील अशोक नगर,कुंभारे कॉलोनी व इस्माईलपुरा येथे तीन टंकी पाणी योजनांच्या बांधकामास सुरुवात करण्यात आली यामध्ये प्रभाग क्र 3 चा ही समावेश आहे मात्र आज पाच वर्षे चा काळ लोटूनही दुसऱ्या टप्प्याचा निधी प्राप्त न झाल्याने मागील तीन वर्षांपासून या तीन टंकी पाणी योजनेचे बांधकाम अर्धवट असून रखडलेले आहे त्यामुळे प्रभाग क्र 4येथील भी सी लाईन ,नागसेन नगर,येथील नागरिकांना भेडसावणारी पाण्याची टंचाई कायम असून उभारण्यात येणाऱ्या अर्धवट रखडलेल्या पाणी टाकी च्या बांधकामामुळे नागरिकांना मिळणारे 24 तास शुद्ध पाणी पुरवठा ही वलग्नाचं ठरत आहे तेव्हा प्रभाग क्र 4 मधील रखडलेले पाणी टंकी योजनेचे अर्धवट काम लवकरात लवकर पूर्णत्वास आणावे अशी मागणी कांग्रेस सेवादल कामठी शहर अध्यक्ष डॉ सुनील वाघमारे यांनी केली आहे.

Popular Articles