spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

चंद्रपूर महानगरपालिकेचे महापौर संगीता राजेंद्र खांडेकर यांच्या हस्ते ₹5.90 कोटींच्या काँक्रीट रस्ता विकासकामाचे भूमिपूजन संपन्न

चंद्रपूर :- दिनांक 17 जुलै 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता, महापौर संगीता राजेंद्र खांडेकर यांच्या शुभहस्ते बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज या मार्गावरील काँक्रीट रस्ता विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न झाले.

सदर विकासकामासाठी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत सन 2025-26 मध्ये ₹5 कोटी 90 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा रस्ता चंद्रपूर शहरातील अत्यंत महत्त्वाचा व वर्दळीचा मुख्य मार्ग असून, बागला चौक ते राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज दरम्यान शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी हा प्रमुख संपर्क मार्ग आहे. तसेच बागला चौक ते लालपेठ कॉलरी परिसराला जोडणारा हा मुख्य रस्ता असल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी, कर्मचारी व विविध वाहनधारकांची या मार्गावर मोठ्या प्रमाणात ये-जा असते. याशिवाय चंद्रपूर शहरातून बल्लारशाकडे जाणाऱ्या पर्यायी (बायपास) मार्ग म्हणूनही या रस्त्याचे विशेष महत्त्व आहे. सदर काँक्रीट रस्ता पूर्ण झाल्यानंतर वाहतुकीस अधिक सुरक्षित, सुकर व गतिमान सुविधा उपलब्ध होणार असून, पावसाळ्यात होणारी गैरसोय कमी होईल, अपघातांची शक्यता कमी होण्यास मदत होईल तसेच परिसराच्या सामाजिक व आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल. हा विकास प्रकल्प नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरणार आहे.

कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती – प्रशांत दानव – उपमहापौर, मनस्वी गिऱ्हे – स्थायी समिती सभापती,  जयश्री जुमडे – सभागृह नेत्या, राजेश अडूर – विरोधी पक्षनेते व गटनेते, वैशाली चंदनखेडे – झोन क्र. २ सभापती, तसेच महाकाली प्रभाग क्र. १२ येथील नगरसेविका करुणा चालखूरे, संगीता अमृतकर तसेच नगरसेवक प्रज्वलंत कडू, नंदू नागरकर, आणि भिवापूर प्रभाग क्र. १५ येथील नगरसेविका ज्योती जिवने तसेच नगरसेवक वसंत देशमुख, सुनील खंडेलवार यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका कटिबद्ध असून नागरिकांना दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकासकामांचा वेग यापुढेही कायम राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Popular Articles