spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खोदकाम करण्यापूर्वी मनपाची परवानगी आवश्यक – आयुक्त डॉ. विपीन

नागपूर :- नागपूर शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू असून, विविध एजेन्सीच्या मार्फत ही कामे केली जातात आहेत. विकास कामे करतांना रस्ते खोदण्यात येतात. या विकासकामांमध्ये समन्वय साधण्यासाठी नागपूर महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन यांच्या पुढाकाराने सर्व संबंधित विभागाची एक बैठक शुक्रवारी (ता. १७) मनपा आयुक्त यांचा सभा कक्षात पार पडली. बैठकीत मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी सर्व विकास करणाऱ्या एजेन्सी यांना खोदकाम करतांना मनपाची मंजुरी घ्यावी लागेल. तसेच यासाठी एक पोर्टल तयार करण्यात येईल. त्यांनी समन्वयाने विकास कामे करण्याचे निर्देश दिले.

बैठकीत महावितरणचे मुख्य अभियंता, महाजेनकोचे मुख्य अभियंता, मनपाच्या अधीक्षक अभियंता डॉ.श्वेता बॅनर्जी, मनोज तालेवार, मनपा नगर रचना विभागाचे  ऋतुराज जाधव, कार्यकारी अभियंता राजेश दुपारे, नागपूर सुधार प्रन्यास, राष्ट्रीय महामार्ग, बीएसएनएलसह इतर विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकातर्फे नाग नदी पुनर्जीवन प्रकल्प, अमृत योजना आणि इतर ठिकाणी कामे सुरू आहे. तसेच विविध शासकीय विभाग सुद्धा नागपुरात कामे करीत आहे. बरेच ठिकाणी असे आढळले आहे की, विकास कामे करतांना रस्त्याच्या खाली युटिलिटी (आवश्यक सेवा) जसे पाईप लाईन, विद्युत केबल, टेलेफोन केबल, आणि इतर बाबी असतात. खोदकामामुळे या सुविधा विस्कळीत होतात आणि त्याचा परिणाम नागरिकांवर होतो. मनपा आयुक्तांनी सर्व विभागांना त्यांच्यामार्फत टाकण्यात आलेल्या केबल लाईनच्या जीपीएस मॅप देण्याचे निर्देश दिले. तसेच कोणतेही खोदकाम करण्यापूर्वी मनपाकडून परवानगी घेण्याचे ही आदेश दिले. त्यांनी सांगितले की, ज्या विभागांनी पूर्व परवानगी घेतली नाही तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल.

Popular Articles