spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विज्ञान भारतीची संघटन बैठक संपन्न

यवतमाळ :- यवतमाळ येथील जाजू इंटरनॅशनल स्कूल मध्ये विज्ञान भारतीची संघटन बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत विज्ञान क्षेत्रातील विविध महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.

बैठकीदरम्यान विद्यार्थी विज्ञान मंथन (VVM) उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे, विद्यार्थ्यांना थेट वैज्ञानिकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणे, तसेच विद्यार्थ्यांसाठी विज्ञान क्षेत्रात स्वतःची क्षमता विकसित करण्यासाठी योग्य मंच निर्माण करण्यावर विशेष भर देण्यात आला. विज्ञानाबरोबरच “विज्ञान आणि जीवन” यांचा परस्पर संबंध अधिक दृढ कसा करता येईल, यावरही विविध मतांची देवाणघेवाण झाली.

या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेत डॉ. शीतल कोकुलवार यांची यवतमाळ जिल्हा संयोजक म्हणून, तर शिल्पा जाजू यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली.

या प्रसंगी विदर्भ प्रांतातील विविध मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये विनय मुलकलवार राज्य समन्वयक, विद्यार्थी विज्ञान मंथन वसुंधरा साठे संयुक्त सचिव, विज्ञान भारती,नरेंद्र सातफळे निरीक्षक, वृंदा देशमुख सहबौद्धिक प्रमुख, राष्ट्र सेविका समिती, विलास देशमुख यवतमाळ जिल्हा संघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,डॉ. संतोष कोकुलवार जिल्हा समन्वयक, 9विद्यार्थी विज्ञान मंथन,नितीन चाटलेवाड तालुका समन्वयक, राळेगाव,राजेश शर्मा जिल्हा सहसंयोजक,रोहित गणोरकर संयुक्त सचिव, विदर्भ प्रांत,यांचा समावेश होता.

बैठकीत विज्ञान प्रसारासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, भविष्यात विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी अधिक व्यापक प्रयत्न करण्यात येईल असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

Popular Articles