– नागरिकांना दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवा देण्या च्या सूचना; वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा.
कन्हान :- नागपुर विधान परिषद सदस्य आमदार डॉ. राजीव पोतदार यांनी बुधवारी (दि.१५) ला कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन आरोग्य सेवांचा प्रत्यक्ष आढावा घेत त्यांनी विविध विभागांची पाहणी करून उपलब्ध वैद्यकीय सुविधा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच आरोग्य केंद्रातील व्यवस्थेची माहिती जाणुन घेतली.
भेटीदरम्यान तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आशीर्वाद नागपुरकर व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. एकांक्षा कानफाडे यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. आरोग्य केंद्रातील मनुष्यबळ, औषधांचा पुरवठा, स्वच्छता, रुग्णसेवा तसेच विविध आरोग्य योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

आमदार डॉ. पोतदार यांनी नागरिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येक रुग्णाला वेळेत, दर्जेदार व संवेदनशील आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या. ग्रामीण भागातील नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, शासकीय आरोग्य योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा, या साठी सेवा गुणवत्तेत सातत्य राखण्यावर त्यांनी विशेष भर दिला. तसेच आवश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवणे, गंभीर रुग्णांना तातडीने उपचार मिळ तील यासाठी प्रभावी नियोजन करणे आणि आरोग्य केंद्रातील सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी सातत्या ने प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमदार डॉ. राजीव पोतदा र यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीमुळे आरोग्य केंद्रातील सेवा अधिक सक्षम व लोकाभि मुख होण्यास सकारात्मक दिशा मिळेल, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली. याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. आयुषी डंभारे, आरोग्य सहाय्यक हंसराज ढोके, सुनील गायकवाड, आरोग्य सेवक श्रावण इंगळे, प्रनिल सोनोने, तिरुपती येतम, सुधाकर पवार, महेंद्र सांगोडे आदी उपस्थित होते.








