spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

यशोधरा नगर येथे 2 लक्ष 90 हजार 600 रुपयांची घरफोडी

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मडी मंदिर जवळील यशोधरा नगर येथे एका कुलुपबंद घरातून अज्ञात चोरट्याने 2 लक्ष 90 हजार 600 रुपयाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना गतरात्री घडली असून यासंदर्भात फिर्यादी प्रिया सुशांत चवरे वय 35 वर्षे रा यशोधरा नगर कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्या विरुद्ध कलम 305,331(3),331(4)भारतीय न्याय संहिता अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार सदर फिर्यादी ह्या 29 सप्टेंबर ला त्यांच्या जिजाजी च्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिघोरी भंडारा येथे गेले असता अज्ञात चोरट्याने घर कुलूपबंद असून घरात कुणी नसल्याचे संधी साधून घरात अवैधरित्या प्रवेश करून लोखंडी कपाटात कपड्याचे आत ठेवलेले 2 लक्ष 90 हजार 600 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली असून ही घटना सदर फिर्यादी घरी परतली असता निदर्शनास आल्याने एकच धक्का बसला.यासंदर्भात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Popular Articles