नागपूर :- भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त (ता. 6) नागपूर महानगरपालिकाद्वारे विनम्र अभिवादन करण्यात आले.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या हस्ते संविधान चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दलातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राला आयुक्तांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. उपायुक्त निर्भय जैन, सहाय्यक आयुक्त श्याम कापसे, सहाय्यक आयुक्त घनश्याम पंधरे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी, अमोल तपासे जितेश धकाते. यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कर्मचाऱ्यांनी देखील डॉ.आंबेडकर यांना आदरंजली अर्पण केली.




