नागपूर :- थोर पराक्रमी, महान योद्धा, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारा विनम्र अभिवादन करण्यात आले.
मनपा मुख्यालयातील महापौर दलानात आज (ता.१४) आयोजित छोटेखानी समारंभात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. या प्रसंगी वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती श्रीमती मनीषा अतकरे यांच्यासह उपायुक्त निर्भय जैन, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत, सहायक आयुक्त श्याम कापसे यांनी अभिवादन केले. याप्रसंगी मनपाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.