spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मनपातर्फे सरदार वल्लभभाई पटेल, इंदिरा गांधी यांना विनम्र अभिवादन

नागपूर :- स्वतंत्र भारताचे प्रथम गृहमंत्री,लोहपुरूष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती व पहिल्या महिला पंतप्रधान, भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीच्या दालनात आयोजित कार्यक्रमात सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मनपाच्या अतिरिक्त आयुक्त  वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी., प्रोबेशनरी आयएएस कुश मोटवानी, उपायुक्त मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त श्याम कापसे, जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती “राष्ट्रीय एकता दिवस” म्हणून साजरी केली जाते, त्याप्रीत्यर्थ मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत यांनी उपस्थितांना “राष्ट्रीय एकता दिवस” ची शपथ देवोवली. तसेच भ्रष्टाचार निर्मुलन सप्ताहअंतर्गत उपस्थितांनी भ्रष्ट्राचार निर्मुलनाची शपथ घेतली. यावेळी जनसंपर्क विभागाचे अमोल तपासे, प्रमोद हिवसे, अनिकेत यादव यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

तत्पूर्वी घाट रोड स्थित सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी मनपाचे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ऍड.धर्मपाल मेश्राम, माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी नगरसेवक डॉ. उपेंद्र कोठेकर, संदीप जाधव, माजी नगरसेविका दिव्या धुर्डे, लता कडगाय, पल्लवी शामकुळे,  मंगला पटेल, माजी नगरसेवक संजय चावरे, श्रीकांत आगलावे, संजय भेंडे,रितेश गावंडे यांच्या इतर नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Popular Articles