spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

ईमामवाडा पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, जबरी चोरी करणारा आरोपी अटकेत

नागपूर :– ईमामवाडा पोलिसांनी धाडसी कारवाई करत जबरी चोरी करणाऱ्या एका आरोपीला अटक केली असून त्याच्यासोबत असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.

घटनेत, फिर्यादी दिनेश राजेश शाहू (वय २३, रा. बजरंग नगर, अजनी, नागपूर) हे आपल्या भावासह व दुकानातील कामगारासोबत व्ही.आर. मॉलसमोरील, मेडिकल चौकाजवळील चायनीज सेंटरवर उपस्थित असताना रात्री १० वाजताच्या सुमारास दोन युवक दुचाकीवरून आले. त्यांनी फिर्यादीस चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ केली व “येथे धंदा करायचा असेल तर ५,००० रुपये हफ्ता द्यावा लागेल,” अशी धमकी दिली. फिर्यादीने नकार दिल्यावर एका आरोपीने फिर्यादीचा हात पकडला, तर दुसऱ्याने दुकानातील गल्ल्यातील २,००० रुपये रोख रक्कम जबरीने उचलून दोघेही पसार झाले.

फिर्यादीने तात्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर ईमामवाडा पोलिसांनी मिळालेल्या वर्णनावरून जलद शोधमोहीम राबवली. या कारवाईत जय सतिश सुर्यवंशी (वय १९, रा. चंदननगर, रमाबाई गार्डनजवळ, ईमामवाडा, नागपूर) याला अटक करण्यात आली, तर त्याचा साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालक ताब्यात घेण्यात आला. चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.

या कारवाईत पोलिसांनी आरोपींकडून एक लोखंडी चाकू, गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर प्लस मोटरसायकल आणि २,००० रुपये रोख असा एकूण ४२,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि. हृदयनारायण यादव, सपोनि. अनिल कांबळे, पोउपनि. आदित्य मडावी, पोहवा. अमित पात्रे, भगवती ठाकूर, विनोद भनारकर, नापोअं. देवेंद्र भोंडे, पोअं. संजय गावंडे व कैलास कोठुळे यांनी संयुक्तपणे केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.