नागपूर :- चामडयाच्या वस्तु व पादत्राणे दुरुस्तीचा व्यवसाय करणारे गटई कामगार हे रस्त्याच्या कडेला उन्हापावसात बसुन आपला व्यवसाय करत असतात. गटई कामगारांना उन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे, तसेच त्यांची आर्थिक उन्नती व्हावी याकरीता 100 टक्के शासकीय अनुदानातून गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल देण्याची योजना राबविण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :-
अर्जदाराचा स्वतःचा प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला. चालु वर्षातील प्राधिकृत अधिकाऱ्याने दिलेला उत्पन्नाचा दाखला. (तहसिलदाराने निर्गमित केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र), शाळा सोडल्याचा दाखला, रेशन कार्डाची झेरॉक्स प्रत, आधार कार्ड झेरॉक्स प्रत. अर्जदार ज्या जागेत स्टॉल मागत आहे ती जागा ग्रामपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका व छावणी क्षेत्र (कन्टॉटमेंट बोर्ड) यांनी भाडयाने/खरेदीने/स्वमालकीचे असल्याबाबतचे भाडेचिठ्ठी कराराची प्रत किंवा खरेदी क्षेत्राची साक्षांकीत प्रत व अर्जदाराचे आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत सोबत जोडावी.
योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बी विंग दीक्षाभूमी रोड नागपूर या कार्यालयात अर्ज सादर करावे, असे आवाहन असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे




